लष्करातील जवान असो वा अतिरेकी असो, पुरुषांबद्दलच जास्त बोललं जातं. स्त्री कोणाच्या खिजगणतीतही नसते.
‘शांतता म्हणजे काय आणि ती कशी असावी?’ या प्रश्नाला सामोरं जाणं अधिकाधिक गरजेचं बनतं. संघर्षपूर्व परिस्थिती भले कितीही वाईट असेल, पण शांतता ‘पुनर्स्थापित’ झाली तरी ती परत येईल? संघर्षाच्या आवर्तात तीव्रतेनं सापडलेल्या स्त्रियांच्या दृष्टीनं स्थिती ‘सामान्य’ होणं म्हणजे नक्की काय असेल? ‘सामान्य’ची व्याख्या कशी करायची? संघर्षपूर्व स्थिती परत येणं की आत्ताचा संघर्ष जैसे थे राहणं?.......